Loksabha MP Suspension Special Report : निलंबन, गदारोळ, मिमिक्री ते नाराजी; लोकसभेत नेमकं काय घडलं?
Loksabha MP Suspension Special Report : निलंबन, गदारोळ, मिमिक्री ते नाराजी; लोकसभेत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन सुरूय. त्यात होणाऱ्या आरोपांवरून आधीच वादाच्या ठिणग्या उडत असताना, तिकडे राजधानी दिल्लीतही वेगळं चित्र नाहीय. आधी संसदेत घुसखोरी, मग त्यावरून विरोधकांचा गदारोळ अशा मार्गांनी हा वाद खासदारांच्या विक्रमी निलंबनापर्यंत पोहोचला. आता तर त्यावरून, घोषणा, निदर्शनं करून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. पण आता हा वाद मिमिक्री आणि जात या विषयापर्यंत पोहोचलाय.