Lok Sabha Seats Allocation : राज्यातील 5 जागांवरून भाजप,शिंदे गटात मतभिन्नता? अंतिम निर्णयाची शक्यता
Continues below advertisement
Lok Sabha Seats Allocation : राज्यातील 5 जागांवरून भाजप,शिंदे गटात मतभिन्नता? बैठकीत अंतिम निर्णय
महायुतीची आज दुपारी ३च्या सुमाराला अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. जागावाटपाचा तिढा आज सुटण्याचे शक्यता आहे. या चर्चांमधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा एबीपी माझाच्या हाती लागला आहे. शिवसेनेनं पाच जागांवर उमेदवार बदलावेत अशी मागणी भाजपनं केली आहे. ठाण्यात संजीव नाईकांना उमेदवारी द्यावी, नाशिकमधून शिंतिगिरी महाराज, कोल्हापूरमधून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेमधून विनय कोरे यांचं नाव भाजपनं सुचवलं आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे हे बदल करण्यास तयार नसल्याचं समजतयं. आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement