Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचा अंदाज, नेत्यांच आवाज, पाहा कोण काय म्हणालं?

Continues below advertisement

Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचा अंदाज, नेत्यांच आवाज, पाहा कोण काय म्हणालं?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान वेगवेगळ्या माध्यम संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये (Exit Polls Result) देशात पुन्हा एकदा भाजप सरस ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एक्झिट पोलच्या या पुरक अंदाजानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कामाला लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या 100 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. 

आज बोलावल्या एकूण सात बैठका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकूण सात बैठका घेणार आहेत. या बैठकांत इशान्य भारतात आलेल्या वादळावर चर्चा होणार आहे. या वादळाच्या अनुषंगाने काय तयारी चालू आहे, काय काम केलं जातंय यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram