Lok Sabha Elections Phase 1 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण, राज्यात किती टक्के मतदान?
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या शेवटाला आता अवघे काही मिनिटे शिल्लक राहिले आहेत. नागपूरसह (Nagpur) पूर्व विदर्भातील (Vidarbha) एकूण पाच मतदारसंघात आज निवडणुकांची रणधुमाळी रंगली असून अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असतांना पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हेच मतदान केवळ 54.85 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 47. 91 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.91 इतके मतदान झाले आहे.