Lok Sabha Election 2024 : महानिकाल Superfast News : 8 AM : 05 May 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLok Sabha Election 2024 : महानिकाल Superfast News : 05 May 2024 : ABP Majha
देशात एऩडीएने गाठला बहुमताचा आकडा, आतापर्यंत एनडीएला २९४ जागा तर इंडिया आघाडीला २३२ जागा, सत्तास्थापनेसाठी रंगणार चुरस.
आज दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एनडीएचे घटक पक्ष म्हणून उपस्थित राहणार.
दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक, बैठकीला शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत आणि संजय राऊत उपस्थित राहणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार.
पंतप्रधान मोदी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा विजयी, दीड लाख मतांनी मोदींचा विजय, मात्र २०१९ च्या तुलनेत मतं आणि मताधिक्य घटलं
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा, तिसऱ्य़ा टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणण्याचा व्यक्त केला विश्वास.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयातून मोदींचं संबोधन, देशातील जनेतेचे आभार मानताना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचं मोदींचं वक्तव्य.
रामाच्या भूमीत भाजपचा पराभव, फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय, भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह पराभूत.