Lok Sabha Election 2024 : लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार
Continues below advertisement
Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, असं असताना राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल ६५ गावातील ४१ हजार ४४० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी सुरु करावी यासह बीड जिल्ह्यातील एका गावाने मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
Continues below advertisement