Nanded Lok Sabha 2024 Opinion Poll : राजकीय उलथापालथ तरीही नांदेडमध्ये काँग्रेसला आघाडी ABP Majha
Nanded Lok Sabha 2024 Opinion Poll : राजकीय उलथापालथ तरीही नांदेडमध्ये काँग्रेसला आघाडी ABP Majha आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिला आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला 18 जागांवर विजय मिळेल, तर महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. या ओपनियन पोलमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. बारामती, परभणी, माढा, हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये सनसनाटी निकाल पाहायला मिळू शकतात. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर राहणार, याचा निष्कर्ष समोर आला आहे.