Police Megacity : लोहगावमधील पोलिसांच्या मेगासिटीचं काम पुन्हा सुुरु होणार, 13 वर्षापासून काम रखडलं

Continues below advertisement


राज्यातील सात हजार पोलीस कुटुंबीयांची मेगासिटीच्या नावानं फसवणूक झालीय. पुण्यातील लोहगावमध्ये ११७ एकरमध्ये पोलिसांसाठी मेगासिटीचं काम १३ वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. या प्रकल्पाला गती न मिळाल्याने १३ वर्षांपासून काम रखडलंय. परिणामी राज्यातील तब्बल सात हजार पोलीस कुटुंबांचं घराचं स्वप्न भंगलंच शिवाय पोलिसांचे कोट्यवधी रुपये यात अडकलेत. या तेरा वर्षांच्या कालावधीत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या यातील साडेपाचशे पोलिसांचं निधन झालंय. एबीपी माझाने हे सगळं प्रकरण समोर आणल्यानंतर विधानसभेत हा विषय लक्षवेधी मांडून उपस्थित करण्यात आलाय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा बिल्डर लवकरच काम सुरु करेल, असं सांगितलं. आज या बिल्डरकडून पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे. शिवाय प्रकल्पासाठी लागणारे साहित्य तयार करणारा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. हा विषय पृथ्वीराज चव्हाण आज पुन्हा विधिमंडळात उपस्थित करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram