Ahmednagar जिल्ह्यातील आणखी 8 गावात Lockdown, आतापर्यंत 69 गावं लॉकडाऊनच्या छायेत
अहमदनगर : एकीकडे राज्यात कालपासून शाळा सुरू झाल्यात मात्र अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमध्ये शाळांची घंटा वाजलीच नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 69 गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून ग्रामस्थांनी मात्र लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी केलीय.