Mumbai : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, Vaccination आणि आकडे पाहता मुंबई सुरक्षित - BMC

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात आली. ज्यात मुंबई महापालिकेकडून कोरोना लशीची पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांची आकडेवारी सादर करण्यात आली. अशातच मुंबईत पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या 89 टक्के असल्याचं समोर आलं आहे तर दुसरी मात्र घेतलेल्यांची संख्या 44.55 टक्के असल्याची माहिती आहे.

सोबतच आजारी, अपंग आणि अंथरूणास खिळलेल्या नागरिकांसंबंधी देखील केंद्र सरकारनं धोरणं आखले आहे. अशात मुंबईत अशांचे देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, असं असलं तरी येणाऱ्या काळात सण-उत्सव असल्याचं खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola