Lockdown 4.0 | उस्मानाबाद जिल्ह्यात 58 दिवसानंतर दारु विक्रीला सुरुवात

Continues below advertisement
उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 58 दिवसानंतर दारू विक्रीला सुरुवात झालीय. त्यामुळं मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत दारू विक्री सुरू राहणार आहे. ज्यांच्याकडे दारू खरेदी आणि बागळण्याचा परवाना आहे त्यांनाच दारू मिळणार आहे. दारू दुकानासमोर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दारू मिळाल्याने अनेक जणांनी आज मटण व दारूच्या पार्टीचा बेत आखलाय. दारू दुकानात कोरोनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram