Jejuri Trustee : खंडोबाच्या भूमीत वादाची ठिणगी, नवीन विश्वस्त मंडळाविरोधात स्थानिकांचं उपोषण
Continues below advertisement
जेजुरी मंदिराच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवडीचा वाद चिघळण्याची शक्यता. 7 पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड, तर सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमल्याने अक्षेप. विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केली आणि वादाला सुरूवात झाली. स्थानिक या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी वाघ्या मुरळ्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय,
Continues below advertisement