Literature Festival : Buldhana Shegaon : मध्ये नाभिक समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाभिक समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. बुलढाण्याच्या शेगावमध्ये हे एकदिवसीय संमेलन संपन्न झालं. 'महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा'ने या संमेलनाचं आयोजन केलं होतं. संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची उपस्थिती होती. या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनातून साहित्यिकांनी विविध गोष्टींवर भाष्य केलंय. त्याचबरोबर समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलंय.