Liquor Seized in Maharashtra : 31st डिसेंबर आधीच पोलिस सक्रिय, राज्यभरात कोट्यवधींची दारू जप्त ABP Majha

31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागतासाठी बनावट दारु साठा राज्याच्या विविध भागातून जप्त करण्यात आला.पालघर,रत्नागिरी, ठाणे आणि पुणे भागातून मोठ्याप्रमाणात बनावट, अवैध दारु जप्त करण्यात आली. पालघरच्या डहाणूमध्ये या कारवाईत तब्बल 11 लाख 61 हजार रुपयांचा दमण आणि खानवेल परिसरातून बनावटीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला. तर तिथे ठाणे जिल्हा आणि परिसरात या महिन्यात एकूण 329 कारवाई केल्या असून यात हातभट्टी दारू आणि विदेशी बनावटीच्या दारू साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातल्या साठवली गावातून 42 हजार 578 रुपयांची गावठी आणि देशी-विदेशी दारु ताब्यात घेण्यात आली आहे. तर पुण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola