Leopard Bhandara : संरक्षण भिंतीवरुन उडी, रस्ता केला क्रॉस; बिबट्याचा थरारक व्हिडीओ ABP Majha
भंडाऱ्याच्या चिखलामधील माईन्स परिसरात बिबट्याचे दर्शन, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण, जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांनी तळ गाठल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं येत असल्याची माहिती.
भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीजचं उत्पादन करणाऱ्या चिखला येथील माईन्स परिसरात रात्री बिबट्या फिरताना आढळून आला. काही कामगार वाहनानं कामावर जात असताना त्यांना अगदी काही फूट अंतरावर एक बिबट माईन्सच्या संरक्षण भीतीवर उभा असल्याचं दिसून आलं. त्यानंतर खाली उडी घेत बिबट तिथून घनदाट असलेल्या झाडीझुडुपात निघून गेला. बिबट्याच्या अस्तित्वानं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काल साकोली इथं बिबट्या रहिवासी भागातील प्रगती कॉलनी इथं दिसून आला होता. सध्या जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांनी तळ गाठला असून वन्यप्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं येत असल्याचं बोललं जातं आहे.