Leopard Menace : अंबड तालुक्यात बिबट्याची दहशत, ऊसतोड मजुरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये बिबट्याच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुखापुरी, पिठोरी आणि शिरसगाव शिवारात बिबट्या दिसल्याने, विशेषतः ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, वनविभागाने आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 'सुखापुरी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना काम करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलंय.' ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने मजुरांनी समूहाने काम करावे आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement