Maharashtra Live Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 12 NOV 2025 : ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरातील स्फोटाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला असून, संशयित i20 सह लाल रंगाच्या EcoSport गाडीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी डॉक्टर ताजबूलसह (Dr. Tajmul) अनेक डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) म्होरक्या मसूद अझरचा भाऊ अम्मार अल्वी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी (Mundhwa Land Scam) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Dy CM Ajit Pawar) राजीनाम्याची मागणी केली आहे. 'या हल्ल्याचा कसून तपास केला जाईल, हल्लेखोरांना सोडणार नाही,' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भूतान दौऱ्यावर असताना दिला. याशिवाय, शिवसेना-राष्ट्रवादी पक्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुढील सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement