Leopard Menace: 'बिबट्या दिसताच गोळ्या घाला', Forest Minister Ganesh Naik यांचे थेट आदेश
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील तरुणांची लग्नं मोडू लागली आहेत, कारण बिबट्याच्या भीतीने कोणीही आपली मुलगी या गावांमध्ये द्यायला तयार नाही. पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गावकऱ्यांना दिलासा दिला आहे. 'जर बिबट्या नरभक्षक झाला असेल, तर त्याला जागीच गोळ्या घालण्यात याव्यात,' असे थेट आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement