Maharashtra Politics : 'भाजपला एकला चलवण्याची हौस आली आहे', Arjun Khotkar यांची भाजपवर टीका

Continues below advertisement
शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Shiv Sena Leader and former Minister Arjun Khotkar) यांनी जालन्यात (Jalna) भाजपसोबतच्या (BJP) महायुतीवर (Mahayuti alliance) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप एकला चलोच्या भूमिकेत असल्याचा आरोप त्यांनी केला. चर्चेसाठी प्रस्ताव देऊनही भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे खोतकर यांनी सांगितले. खोतकर म्हणाले, 'त्यांना वाटतं की आता फार काही आम्ही मोठे झालोत, पण त्यांना आता एकला चलवण्याची हौस या ठिकाणी आलेली आहे'. या संघर्षात त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Former Union Minister Raosaheb Danve) आणि आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे संकेत दिले. भाजपने सोबत यावे, अन्यथा आम्हीही निवडणुकीसाठी तयार आहोत, असा इशारा खोतकर यांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola