Maharashtra News : 9 हजार व्होल्टचा करंटही फेल! Satyashil Sherkar यांच्या घरात बिबट्याची उडी

Continues below advertisement
जुन्नर (Junnar) मध्ये बिबट्याचा वावर आता थेट राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांच्या घरात बिबट्याने प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. 'या घटनेमुळे सरकारी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाने ठोस पाऊले उचलावीत,' अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. शेरकर यांच्या निवासस्थानाच्या कंपाऊंडला तब्बल नऊ हजार डीसी व्होल्ट क्षमतेचे इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवलेले आहे. मात्र, तरीही बिबट्या कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरला आणि त्याला विजेचा धक्का बसला नाही. सध्या राज्य सरकार बिबट्याप्रवण क्षेत्रात शॉक देणारी मशीन बसवत आहे. परंतु, इतक्या उच्च तीव्रतेच्या करंटलाही न जुमानणाऱ्या बिबट्यामुळे या सरकारी मशीनच्या परिणामकारकतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर शंका उपस्थित होत आहे. या घटनेने मानव-वन्यजीव संघर्षाचा (Human-Wildlife Conflict) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola