Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त

Continues below advertisement
कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक राजवट लागू असल्याने शहराचा विकास खुंटला असून भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. 'कुचकामी प्रशासन आहे, खरं म्हणजे या प्रशासनाची इन्क्वायरी लागायला पाहिजे,' अशा शब्दात एका संतप्त महिलेने प्रशासनावर ताशेरे ओढले. शहरातील खराब रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि CCTV कॅमेऱ्यांची कमतरता, अंबाबाई मंदिर परिसरात पर्यटकांची होणारी गैरसोय आणि वाढती गुन्हेगारी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. कोट्यवधींचा निधी येऊनही विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू मैदानासारख्या वारसा स्थळांची दुर्दशा झाल्याची खंतही महिलांनी 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी कुलदीप माने यांच्यासमोर व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola