Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार, पोलिसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

Continues below advertisement
कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर पकडण्यात यश आले आहे. या बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली होती आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) उपचार सुरू आहेत. वनविभाग, पोलीस आणि स्थानिक तरुणांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर, दोन तासांच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. रिपोर्टर विजय केसरकर यांनी माहिती दिली की, 'जवळपास पंधरा ते वीस युवक त्याच्या जवळ त्याच्या त्याच्यावरती झडप घालून या ठिकाणी त्याला जेरबंद केलंय.' या घटनेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मानवी वस्तीत वन्य प्राण्यांच्या वाढत्या घुसखोरीचा आणि आव्हानांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. बिबट्याला पकडल्यामुळे कोल्हापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola