Leopard in Kolhapur: नागाळा पार्कमध्ये बिबट्याचा थरार, 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर जेरबंद.
Continues below advertisement
कोल्हापूर (Kolhapur) शहरातील नागळा पार्क (Nagala Park) या वर्दळीच्या परिसरात बिबट्या शिरल्याने प्रचंड खळबळ उडाली. एका हॉटेलच्या परिसरातून हा बिबट्या महावितरण (MSEDCL) कार्यालयाच्या आवारात शिरला आणि एका चेंबरमध्ये अडकला. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्त मोहीम राबवली. 'या दोन तासांच्या थरारनाट्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण जखमी झाले, आणि अखेरीस त्याला जेरबंद करण्यात यश आले'. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आणि बचाव कार्यादरम्यान काही काळ वाहतूकही थांबवण्यात आली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement