Delhi Blast : 'जोपर्यंत Pakistan आहे, दहशतवाद राहणार', संरक्षण विश्लेषक Hemant Mahajan यांचा दावा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात (Delhi Bomb Blast) आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हा एक दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. या हल्ल्याबाबत बोलताना संरक्षण विश्लेषक ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन म्हणाले, 'जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, त्यांना चीनकडनं मदत मिळते आहे आणि त्यांचे समर्थक भारतात आहेत, तोपर्यंत दहशतवादी कृत्यं चालूच राहणार आहेत'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, 'हल्लेखोरांना सोडले जाणार नाही,' असा इशारा दिला आहे. महाजन यांनी पुढे म्हटले की, भारताच्या शांतताप्रिय धोरणाला धक्का पोहोचवण्यासाठी हा हल्ला घडवण्यात आला आहे. या हल्ल्याचा संबंध मे २०२५ मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'शी जोडला जात आहे, जे भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola