Leopard Attack: पुणे हादरलं! अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, थरार CCTV मध्ये कैद
Continues below advertisement
पुण्याच्या (Pune) शिरूर आणि खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटनांनी दहशतीचे वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रोहन बोंबे (Rohan Bombe) या १३ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर, खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला, ज्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. या घटनांनंतर स्थानिकांमध्ये भीती पसरली असून त्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे (Man-Animal Conflict) परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संतप्त गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि आंदोलनं केली आहेत. शासनाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी निधी मंजूर केला असून पिंजरे आणि विशेष पथके तैनात केली आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement