Leopard Attack: नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याचा थरार, दोन कुत्र्यांना केले ठार; घटना CCTV मध्ये कैद
Continues below advertisement
नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात (Niphad Taluka) बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील एका शेतकरी वस्तीवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून दोन पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य बनवले. ही संपूर्ण घटना वस्तीवर लावलेल्या कॅमेऱ्यात (Camera) कैद झाली आहे, ज्यामुळे बिबट्याच्या दहशतीचा स्पष्ट पुरावा समोर आला आहे. दिवसेंदिवस वाढणारे हे हल्ले केवळ पाळीव प्राण्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या वाढत्या घटनांमुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement