Leopard Attack: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक

Continues below advertisement
राज्यात अनेक ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष पेटला असून अहिल्यानगर (Ahilyanagar), पुणे (Pune) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. कोपरगावच्या येसगावमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी 'नरभक्षक बिबट्याला ठार करा' अशी मागणी करत नगर-मनमाड महामार्ग रोखून धरला. पुणे जिल्ह्यातील जुन्नरनंतर (Junnar) आंबेगावच्या (Ambegaon) थोजाळेमध्ये तीन बिबटे एकत्र दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाही घराबाहेर पडणे कठीण झाल्याने या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारातही रत्नेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. दुसरीकडे, भंडाऱ्याच्या उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्पात मात्र पर्यटक वाघिणीला आणि तिच्या बछड्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola