Sunil Tatkare On Mahendra Dalvi : 'महेंद्र दळवी स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात', सुनील तटकरेंचा घणाघात

Continues below advertisement
राज्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत, यावेळी रायगडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'महेंद्र दळवी हे स्वतला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजत आहेत', असा घणाघात सुनील तटकरे यांनी केला आहे. दळवी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. दळवी यांना आवरले नाही, तर आगामी काळात आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ, असा थेट इशारा तटकरे यांनी दिला आहे. रायगडमधील पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले हे शाब्दिक युद्ध आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola