MLC Election Result : शिक्षक, पदवीधरमध्ये कोण मारणार बाजी? पाचही जागांसाठी मतमोजणी सुरु

Continues below advertisement

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 3 लाख 73 हजार 166 पैकी 2 लाख 40 हजार 796 मतदारांनी मतदान केल्यानंतर आता आज सकाळपासून मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठ नंतरच निकाल येतील असा अंदाज बांधला जातोय. मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढली आणि उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन यावेळी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे .यासाठी पाच फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांमध्ये वैध मतांची छाननी करून पहिल्या पसंतीच्या मतांची सुरुवातीला मोजणी करण्यात येणार आहे. निवडून येण्यासाठीच्या मतांचा कोटा ठरल्यानंतर प्रथम पसंती क्रमांकावर कोणत्याही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत..

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram