Laxman Hake Viral Video: ओबीसी नेतृत्वावरून वाद, Video 'फेक' असल्याचा दावा!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी समाजाच्या नेतृत्वाविषयीच्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेल्याने माळी समाजाच्या पोटात दुखत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यानंतर लक्ष्मण हाकेंनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'फेक' असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केला आहे. ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडण्याचा हा डाव असल्याचंही हाके म्हणाले. "ओबीसींचे नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेलंय. हे त्यांच्या पोटात दुखतंय," असे वक्तव्य व्हिडिओमध्ये आहे. हाकेंच्या या व्हायरल व्हिडिओवरून आता आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola