Viral Anti-Corruption Speech | भ्रष्टाचारविरोधात भाष्य करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील पाच वर्षांच्या श्रीजा करंजे या चिमुकलीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या भाषणामधून तिने भ्रष्टाचाराविरोधात आपले मत मांडले. राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ शेअर करत तिचे कौतुक केले. एबीपी माझासोबत बोलताना श्रीजाने सांगितले की, ती मोठी झाल्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार आहे. श्रीजा म्हणाली, "बाबा बोलतात भ्रष्टाचारांनी देश पोखरात चाललाय. जेवढं इंग्रजांनी आपल्या देशाचा नसेल लुटलं, तेवढं या भ्रष्टाचारांनी लुटलंय." सध्या करोडो, शंभर करोड, हजारो करोड रुपयांचे घोटाळे होत असल्याचेही तिने नमूद केले. तिच्या या परखड मताचे सर्वत्र कौतुक होत आहे.