Top 100 Headlines : 3.30 PM : टॉप 100 : 9 Nov 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha
Continues below advertisement
पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या जमीन घोटाळा प्रकरणावरून राजकारण तापले आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून (Local Body Elections) महायुतीमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. 'पवारांच्या हातामध्ये जमिनी गायब करण्याची जादूची कांडी असते, त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवार यांनी घ्यावं', असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी लगावला आहे. अकोला दंगल (Akola Riots) प्रकरणाच्या SIT चौकशीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात मतभेद निर्माण झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. दरम्यान, राज्यात २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून, अनेक ठिकाणी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) लवकरच एका मालिकेत एकत्र दिसणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement