Laxman Hake on OBC Resrvation : आम्हाला नोटिस दिली तशीच जरांगे पाटील यांना दिली का?

Continues below advertisement

OBC leader Laxman Hake : ओबीसी आरक्षण बचावसाठी (OBC Resrvation) आजपासून अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार ओबीसी नेते लक्ष्मण हाके  यांनी केला आहे. मात्र त्यापूर्वीच लक्ष्मण हाके यांना (OBC leader Laxman Hake) पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. मात्र लक्ष्मण हाके आपल्या आंदोलनावर ठाम असून सकाळी अंबड कडे बैठकीसाठी रवाना झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Resrvation) रक्षणासाठी लक्ष्मण हाके हे प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत, त्यासाठी अंबड येथे बैठक पार पडणार आहे.

अशातच शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके  यांनी केला आहे. ओबीसीची यापूर्वी तीन आंदोलन झालीत. मात्र, शासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, याचे आम्हाला दुःख असून शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. परिणामी आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून उपोषणाच्या आंदोलनापासून तसूभर सुद्धा बाजूला हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा  लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे नेमकं काय होत याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram