Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाही
Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाही
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे प्रचारासाठी हाकेंची जाहीर सभादेवेंद्र फडणवीस यांच्यातील क्षमता पहा, त्यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का ? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. जिथे वांचीतचा उमेदवार नाही, ओबीसी आरक्षणाच्या विचाराचा उमेदवार नाही, तिथे एक वेळेस भाजपला मतदान करू मात्र शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचं आंदोलन मोठं केल्याचे हाके म्हणाले. महाराष्ट्रात ओबिसीचे 25 आमदार सत्तेत असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके यांची सभा त्यावेळी बोलत होते.