Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक

Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक

Laxman Hake slams Ajit Pawar: अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. अमोल मिटकरी (Amol Mitkari) आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात. सुरुवात अमोल मिटकरीने केली आणि शेवट आम्ही करणार, असेही हाके (Laxman Hake) यांनी ठणकावून सांगितले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले. उद्या सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार यांनाही सोबत घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या ना. हे काय गौडबंगाल आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. मला एक गाडी गिफ्ट दिली होती. माझ्या जुन्या गाडीला खूप मेंटेनन्स होता. लोकांनी गाडी दिल्यानंतर त्याच दरम्यान सारथीला निधी उपलब्ध होतो, महाज्योतबाबत दुजाभाव केला जातो म्हणून मी अर्थमंत्री याला उद्देशून एक पत्रकार परिषद केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा, अशा पद्धतीचे त्याने वक्तव्य केले होते. मी उद्या अमोल मिटकरी यांच्या गावात जाणार आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola