Laxman Hake Doctor Health Update : लिव्हरला सूज, बीपी वधारला; उपोषणानंतर हाकेंची तब्येत कशी?
Laxman Hake Doctor Health Update : लिव्हरला सूज, बीपी वधारला; उपोषणानंतर हाकेंची तब्येत कशी?
नोंदी नसताना अनेकांना ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्यात आलं. आम्हाला बाजूला काढून कायदा करून 16 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे घटनेनं दिलेलं आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करून टाका, अशी भूमिका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्य मागासवर्गाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगेंचे दावे खोडले आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण, त्यामागची भूमिका, आरक्षण कशासाठी आहे, अशी तपशीलवार माहिती दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. कुणबी समाज मराठा समाजापेक्षा वेगळा आहे"ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्रात घातला जात आहे. कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे. कुणब्यांचे काही प्रकार आहेत. खान्देशी कुणबी, काळे कुणबी, वऱ्हाडे कुणबी, कोकणी कुणबी, दलेरी कुणबी, खैरे कुणबी, घाटोळी कुणबी, खेडूले कुणबी आहेत. हेच खरे कुणबी आहेत. हे कुणबी मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत. त्यांचे देव वेगळे आहेत. त्यांचा रितीरिवाज वेगळा आहे. त्यांचे सोयरेपण वेगळं आहे. त्यांचे राहणीमान वेगळे आहे. मानववंशशास्त्राप्रमाणे स्वभाव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे कुणबी या एका शब्दाला घेऊन ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या चुकीच्या आहेत," असे हाके म्हणाले.