Lawyers on ST Strike : सरकारसाठी हा संप असेल, एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा दुखवटा : अॅड. गुणरत्न सदावर्ते
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आलीये. समितीमध्ये मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव वित्त आणि परिवहनचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. 28 कामगार संघटनांची बाजू ऐकुन घेऊन त्या अहवालाची प्रत या समितीला मुख्यमंत्र्यांकडे सादर करावी लागणार आहे. 12 आठवड्यांच्या आत हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणं बंधनकारक आहे. त्यामुळे आता कर्मचारी संघटना नेमकी काय भूमिका घेतात हे बघावं लागेल.