CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न, देशभरातून निषेध, NCP आक्रमक

Continues below advertisement
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर सुप्रीम कोर्टात वकील राकेश किशोरने बूट काढत त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन केले. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवारांनी निषेध नोंदवला. या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याजवळ बूट घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाली आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून या कृतीचा निषेध केला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola