Beed Landslide Threat: कपिलधारवाडीत 'Malin' सारख्या दुर्घटनेची भीती, ग्रामस्थ भयभीत!
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी गावाला सततच्या पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. गावातली घरे, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावात पाहणी केली असली तरी, प्रशासनाने अद्याप ग्रामस्थांसाठी ठोस पावले उचललेली नाहीत. ग्रामस्थांनी स्थलांतर करून पुनर्वसनाची मागणी केली आहे. गावातल्या रस्त्यांना जवळपास एक ते चार फूट अंतराच्या भेगा पडल्या आहेत. चार दिवसांपासून ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाने कपिलधारकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. एका ग्रामस्थाने सध्याची परिस्थिती सांगताना म्हटले, "खाऱ्या प्यायची सध्या पंचायत, राहायची पंचायत आली." गेल्या वर्षी पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठवला होता, तो मंत्रालयात प्रलंबित आहे. माळीणसारखी घटना घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement