NCP Office Dance: 'पाहण्याची नजर कशी आहे', Nagpur मधील लावणी वादावर अध्यक्ष आदिल अहिरकर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी नृत्य सादर झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी शहराध्यक्ष आदिल अहिरकर आणि नृत्यांगना शिल्पा शाहीर आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आदिल अहिरकर म्हणाले, 'आमच्या पक्ष कार्यालयामधले ती जिने लावणी सादर केली ती शिल्पा शाहिद ही आमच्या महिला लोकशाही वाईस प्रेसिडेंट आहे आणि बघण्याची दृष्टी कशी ते महत्वाचे आहे'. 'वाजले की बारा' या गाण्यावरील नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागली आहे. अहिरकर यांनी स्पष्ट केले की, हा पक्षांतर्गत कार्यकर्त्यांसाठी कला सादर करण्याचा कार्यक्रम होता आणि लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी मुख्यमंत्र्यांसमोरही सादर होते, असे म्हणत त्यांनी या सादरीकरणाचे समर्थन केले. या प्रकारानंतर खासदार सुनेत्रा पवार यांनीदेखील नाराजी व्यक्त करत शहराध्यक्षांकडून माहिती घेतली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola