Land Row: 'आम्ही काचेच्या घरात राहत नाही', Devendra Fadnavis यांचा विरोधकांना थेट इशारा

Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईत भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन झाले, पण या जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. 'भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका', असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या भूखंडाच्या फाईलचा प्रवास 'राफेलच्या वेगाने' झाल्याची टीका करत अमित शहांना पत्र लिहिले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ही जागा धोकादायक इमारत दाखवून ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. एकीकडे भाजपचे भव्य कार्यालय उभे राहत असताना, दुसरीकडे मरीन लाईन्स येथील मराठी भाषा भवनाचे काम रखडले असल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola