Latur Heavy Rain : लातूर जिल्ह्यात मुसळधार; रेणा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

Continues below advertisement

Latur Heavy Rain : लातूर जिल्ह्यात मुसळधार; रेणा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

मागील दोन दिवसांमध्ये सातत्याने लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी 18 मिलिमिटर आणि मागील 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले ओढे भरून वाहत आहेत. लातूर जिल्ह्यातून मांजरा नदी 145 किलोमीटरचा प्रवास करते.. या नदीवरील बारा बॅरेजेस भरून वाहत आहेत. तेरणा ,रेणा ,मन्याड या नद्या ही दुथडी भरुन वाहताना दिसत आहेत... मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात म्हणजेच बीड आणि धाराशिव मध्ये पाऊस होत असल्याने धरणात पाण्याचा जोर वाढला आहे. रेणा मध्यम प्रकल्प 98% पेक्षा अधिक भरल्याने त्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या नदीवरील चार बंधारे ही भरून वाहत आहेत.. नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे... याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram