Latur District | लातूर जिल्ह्याचं विभाजन होणार, उदगीर जिल्हा निर्मितीसाठी हालचालींना वेग | ABP Majha
लातूर जिल्ह्यातून नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. लातूरमधून नवीन उदगीर जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. उदगीर नवीन जिल्हा निर्मितीचा आणि प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.