Lata Mangeshkar यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु, लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती

लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत...  लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलीए.. आता ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्यात...आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रुग्णालयात तासभर लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. दरम्यान लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हे लतादीदींच्या निवासस्थानी पोहोचलेत

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola