Lata Mangeshkar : साताऱ्यातील बिर्याणीची लतादीदींना भुरळ, खवय्या लतादीदींच्या आठवणींना उजाळा
स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्या जाण्यानंतर संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात असताना त्यांच्या वेगवेळ्या आठवणींना सध्या उजाळा दिला जात आहे. लतादीदी ह्या खाण्याच्या बाबतीत खूपच शौकीन होत्या. मात्र त्यांच्या जेवणातील एक खास मेनू म्हणजे साताऱ्यातील युसूफ बागवान आर्थात बिर्यानीवाले चाच्यांच्या हातची बिर्यानी. लतादीदी पश्चिम महाराष्ट्रात आल्या की त्यांचा ठरलेला मेनू म्हणजे बिर्यानी. आणि तीही युसूफचाचा यांची. मग त्यांना फोन करणे आणि बिर्यानी आणून द्यायला सांगणे. इतकच काय त्यांनी या युसूफचाचा यांच्या चक्क घरात येऊनही अनेकवेळा बिर्याणीचा स्वाद घेतला. युसूफचाचा अशा माळरानावर रहायचे की त्या ठिकाणी जाणेही कठीण . मात्र ती झेड सिक्युरीटी याच रस्त्याने पळत या युसूफ भाईंच्या घरापर्यंत पोहचायची. युसूफ भाई हे लतादीदींच्या गाण्याचे शोकिन. मात्र त्यांच्या या शौकमधून या युसूफचाचांच संपुर्ण आयुष्यच बदलल. याच य़ुसूफचाचांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी.