PM Modi on Corona Spread : देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार : पंतप्रधान मोदी
PM Modi in Lok Sabha : भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. पण कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली.