Ambadas Danve X Post : 'तीन जादुगारांची हातचालाखी, शेतकऱ्यांची फसवणूक'शेतकरी पॅकेजवरुन दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
शिवसेनेचे (UBT) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील महायुती सरकारवर अनेक मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. 'महायुती सरकारने जाहीर केलेले ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज ही शेतकऱ्यांची दिशाभूल असून, सत्तेतील तीन जादूगारांनी केलेली ही हातचलाखी आहे,' असा घणाघाती आरोप दानवे यांनी केला. त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'हंबरडा मोर्चा'च्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरले. या पॅकेजमध्ये जुन्याच योजना आणि पीक विम्याची रक्कम दाखवून केवळ आकड्यांचा खेळ केल्याचा दावा त्यांनी केला. याचवेळी त्यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर 'स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट' असा प्रवास असल्याची बोचरी टीका करत जुन्या दिवसांची आठवण करून दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement