Lalit Patil Drugs Case : उबाठा गटातील नेत्यांचेही ललित पाटलांसोबतचे फोटो व्हायरल ABP Majha

Continues below advertisement

ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. 
ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा हात असल्याचा  खळबळजनक आरोप ठाकरे गटाने केलाय.. यावर पुरावे सादर करा असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय..दरम्यान ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात... शिंदे गटानं या फोटोची चौकशी व्हावी अशी मागणी केलीए... तर दुसरीकडे फोटोत दिसणारे दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवर आणलं होतं असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय...त्यामुळे आता या फोटोवरुन राजकारण तापलंय...  उद्धव ठाकरे ललित पाटीलला शिवबंधन बांधतानाचा फोटो व्हायरल. हेमंत गोडसे, दादा भुसेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. २०१६ साली सेनेत प्रवेश करतानाचा ललितचा फोटो व्हायरल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram