Lalbaugh Best Bus Accident Special Report : मद्यधुंद प्रवाशामुळे तरूणीचा जीव गेला

Continues below advertisement

Lalbaugh Best Bus Accident Special Report : मद्यधुंद प्रवाशामुळे तरूणीचा जीव गेला

गणेशोत्सवात नेहमीच गजबजलेलं लालबाग, रविवारी मात्र भीषण अपघातानं हादरल्याचं पाहायला मिळालं. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे एकीकडे बाप्पाच्या आगमनामुळे, तर दुसरीकडे खरेदीसाठी आलेल्या लोकांची गर्दी होती. अशातच, एक बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि त्या बसनं 9 जणांना उडवलं. काही काळासाठी लालबागमध्ये एकच गोंधळ, आक्रोश पाहायला मिळाला. अपघातातील 9 जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झालेल्या, त्यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

लालबागमध्ये राहणारी 28 वर्षांची नुपुरा मणियार भीषण अपघातात मरण पावली. नुपुराच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधील मद्यधुंद प्रवासी कारणीभूत ठरला. कारण बस अनियंत्रीत होण्यासाठी हा मद्यधुंद प्रवासी कारणीभूत होता. बेस्ट बसची 66 क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर येथून राणी लक्ष्मीबाई चौक, सायनच्या दिशेनं जात होती. अशातच, लालबागमधील गणेश टॉकीजजवळ बेस्ट बस येताच, मद्यधुंद प्रवासी आणि चालकामध्ये वाद झाला. त्यानंतर हैदोस घालणाऱ्या प्रवाशानं बसचं स्टेअरिंग खेचलं. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि तिनं तब्बल 9 जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारनं नाहक जीव गमावला. 

लालबाग परिसरात 1 सप्टेंबरला झालेल्या एका बस अपघातात 9 जण जखमी झाले, तर एका कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवणाऱ्या लेकीचा मृत्यू झाला. नुपूराच्या जाण्यानं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं. दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशामुळे निष्पाप एका मुलीला जीव गमवावा लागला. नक्की हा अपघात कसा झाला? मनियार कुटुंबाची कमावती लेक गेली याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या मणियार कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram