Lalbaugcha Raja Visarjan | लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर, Anant Ambani उपस्थित
गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. मात्र समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे विसर्जनाला विलंब झाला. भरती आणि ओहोटीच्या परिस्थितीमुळे बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवताना अडचणी आल्या. साधारणपणे १२ ते १३ तासांचा उशीर झाल्यानंतर, ओहोटी सुरू झाल्यावर गुजरातवरून आलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली. त्यानंतर पुन्हा भरतीची वाट पाहून विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली. या विसर्जन सोहळ्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी गिरगाव चौपाटीवर जमली होती. मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी हे देखील लालबागच्या राजाचे चर्मी मुखी सेवाध्यक्ष म्हणून तराफ्यावर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब अंबडे आणि महासचिव सुधीर सहाजे यांनी माध्यमांना माहिती दिली. मुंबई महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस आणि इतर गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी विसर्जन सोहळ्यासाठी सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.